Monday, October 16, 2023

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्य वाचन प्रेरणा दिन संपन्न

दि.15 आक्टो.2023


         संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरुड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ.जी.आर.तडस यांच्या मार्गदर्शनाखाली माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्य रासेयो विभाग, ग्रंथालय
विभाग व आय.क्यू.ए.सी.  विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.आर. तडस हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.राम कुलसंगे,डॉ.श्याम जाधव, डॉ.रविकांत महिंदकर हे उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ.ए.पी. जे.अब्दुल कलाम व डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून रविकांत डॉ. महिंदकर विद्यार्थ्यांमधील वाचनाची रुची कशी वाढवावी यावर आपले विचार व्यक्त केले.तसेच कार्यक्रम आयोजित करण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जी.आर.तडस यांनी आपले विचार मांडताना माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी संघर्षातून जीवनाला आकार दिला व देशासमोर एक आदर्श नवा ठेवला.पुस्तक वाचनाने, अभ्यासाने माणसाला उच्च ठिकाणी जाता येते हे सिध्दकरून दाखविले असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी डॉ.राम कुलसंगे यांनी मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे जीवन प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा मार्ग पादाक्रांत करतांना डॉ कलामांना आदर्श मानावे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा.शशिकांत काळे यांनी केले तर आभार डॉ.श्याम जाधव यांनी मानले. याप्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विनायक भटकर, इंग्रजी विभाग प्रमुख तसेच आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ.अजय कुकडे, श्री दिनेश राऊत,श्री निलेश खुरद,अर्चना राऊत,श्री संतोष चव्हाण, श्री निलेश बंदे, श्री अंबादास खंडारे, श्री अनिल हरले.तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

N-LIST Awareness Workshop कार्यशाळेचे आयोजन

          संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणि...