Tuesday, August 29, 2023

कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये नुकताच पाचवा पदवी वितरण समारंभ संपन्न

 


                     संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये नुकताच पाचवा पदवी वितरण समारंभ प्राचार्य डॉ.जी.आर.तडस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा व शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून तसेच विद्यापीठ गीत गाऊन करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.आर.तडस हे उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.आर.एन.फुलारी, डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी कला महाविद्यालय,शेंदूरजनाघाट,हे उपस्थित होते.तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ राम कुलसंगे,डॉ.विनायक भटकर,डॉ.रविकांत महिंदकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जी.आर.तडस यांनी काळानुसार विद्यार्थ्यांनी बदलले पाहिजे.परिवर्तन हा सृष्टीचा नियम असून ज्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेतले ते पुढे गेले.सत्यवादी , प्रामाणिक माणूस जीवनात कधीही अयशस्वी होत नाही.हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. पुस्तकांशी नाते जोडा पुस्तकेच आपले खरे गुरु आहेत.असे प्रतिपादन केले. तर प्रमुख अतिथी डॉ.आर.एन.फुलारी यांनी   सध्याच्या काळात संघर्षा शिवाय पर्याय नाही.विद्यार्थ्यांनी पदवी मिळून स्वयंरोजगार निर्माण करावा. विद्यार्थ्यांनी निराश हतबल न होता त्यातून मार्ग काढून परिस्थितीवर मात करावी. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करावे.आत्मनिर्भर बनवून मन ओतून प्रत्येक काम करावे. कला कौशल्य वापरून रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्या.हस्त कौशल्य,बुद्धी कौशल्य आणि भाषा कौशल्य इत्यादी कौशल्ये आत्मसात करून स्वतःचा विकास करावा. शिक्षणामुळे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि तुम्ही स्वयंपूर्ण जीवन जगण्यास पात्र होता.असे सांगितले. या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.विनायक भटकर, डॉ.रविकांत महिंदकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.

कला शाखेच्या 5 विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण सन्माननीय अध्यक्षांच्या व प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.आकाश मानकर व कु. रोशनी बडोदे या  2 विद्यार्थ्यांनी प्रविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केली.तर 3 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राम कुलसंगे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्याम जाधव यांनी केले.या प्रसंगी डॉ.राम कुलसंगे , डॉ.विनायक भटकर,डॉ.रविकांत महिंदकर प्रा. शशिकांत काळे ,गजानन चव्हाण,अर्चना राऊत,दिनेश राऊत, निलेश खुरद, राहुल धूर्वे, गणेश आहाके,अनुप बगेकर,गौरव यावलकर,प्रतीक होले,सोनाक्षी दंडाळे, कु.सोनम बडोदे, प्रा.प्रदीप आवारे,प्रा.बिडकर मॅडम,प्रा. मोहिनी दारोकर,निलेश बंदे तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

 

 

Sunday, August 13, 2023

डॉ. एस.आर रंगनाथन यांची 131 वी जयंती ग्रंथालय विभागाच्या साजरी

 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरुड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये डॉ. एस.आर रंगनाथन यांची 131 वी जयंती ग्रंथालय विभागाच्या वतीने नुकतीच साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. जी. आर. तडस उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.श्याम जाधव,डॉ.विनायक भटकर व डॉ.राम कुलसंगे हे उपस्थित होते. सर्वप्रथम शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. आर.तडस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रंथालयामधील ग्रंथांचा आपण मोठ्या प्रमाणात उपयोग करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला वाचाल तर वाचालअसा संदेश दिला.त्याचे अनुकरण आपण केले पाहिजे.वाचनामुळे मनुष्य आपले ध्येय गाठून समाजात जावून आदर्श कार्य करू शकतो असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी प्रा.डॉ.श्याम जाधव यांनी ग्रंथालय महाविद्यालयासाठी किती महत्वाचे आहे हे सांगितले.

ग्रंथपाल प्रा. डॉ. रविकांत महिंदकर यांनी प्रास्ताविकामधून ग्रंथालय शास्त्रामध्ये डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी  केलेल्या भरीव कार्याचा परिचय करून दिला. तर प्रमुख अतिथी डॉ.विनायक भटकर यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक असे संबोधले जाते. संशोधनामध्ये ग्रंथालयाची भूमिका महत्वाची असून संशोधकांनी ग्रंथालयाचा वापर केल्याशिवाय संशोधन कार्य पूर्ण होत नाही असे संगितले.

या प्रसंगी प्रा. शशिकांत काळे, दिनेश राऊत निलेश खुरद, अर्चना राऊत, संतोष चव्हाण, निलेश बंदे, श्री. गजाजन चव्हाण, संतोष चव्हाण ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शशिकांत काळे,  यांनी केले तर निलेश बंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Saturday, August 12, 2023

आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला

 


 


संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरुड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामीण रूग्णालय,वरूड व कला व वाणिज्य महाविद्यालयातील रासेयो विभागातील रेड रिबन क्लब तर्फे आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.आर.तडस यांच्या उपस्थितीत महा युवा संवाद एचआयव्ही /एड्स जनजागरण अभियान कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह प्रक्षेपण सकाळी 11 वा. पासून करण्यात आले.यावेळी ग्रामीण रुग्णालय वरूड येथील एच.आय.व्ही.कक्षाचे कौन्सिलर श्री गजेंद्र बेलसरे,कौन्सिलर श्री आशिष अंधारे,तंबाखू मुक्त अभियानाचे कौन्सिलरचे श्री कालिदास उपरे ,डॉ.श्याम जाधव,डॉ.राम कुलसंगे, डॉ.विनायक भटकर,डॉ.रविकांत महिंदकर,रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.शशिकांत काळे,दिनेश राऊत,निलेश खुरद,अर्चना राऊत,संतोष चव्हाण,निलेश बंदे,अनिल हरले

Tuesday, August 8, 2023

ग्रंथालय विभागा दौरे एक महिन्याचे ग्रंथालय प्रशिक्षण संपन्न

 

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ जी आर तडस यांच्या नेतृत्वात व ग्रंथपाल डॉ. रविकांत महिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल डॉ.विजय ठाकरे आय एम एस कॉलेज वरूड यांच्या विशेष सहकार्याने ग्रंथालय विभागाच्यावतीने (10 जून ते 10 जुलै 2023 ) एक महिन्याचे ग्रंथालय प्रशिक्षण देण्यात आले.यामधे आय एम एस महाविद्यालय,वरूड येथील बी.लीफ.च्या कु.आचल बहुरूपीमुकेश युवनातेकु.रुपाली उईकेकु.समीक्षा ढोककु.पायल खनखनेकु.मनिषा ब्राम्हणे या विद्यार्थ्यांनी  ग्रंथालयातील संगणिकिकृत सर्व कामे  एक महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये डॉ रविकांत महिंकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केले. सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व भेटवस्तूवितरित करण्यात आल्या


 


.

Friday, August 4, 2023

जरुड कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.



 

        संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जरुड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ.जी.आर तडस यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षमित्र, माजी सैनिक जरुड गावचे सरपंच श्री सुधाकर मानकर यांच्या उपस्थितीत कला वाणिज्य महाविद्यालय जरूड येथे वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. महाविद्यालय परिसरामध्ये  १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये पाम,कडू बदाम,सीताफळ, चिक्कू कडुनिंब इत्यादी विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले.या प्रसंगी प्राचार्य डॉ.जी.आर.तडस,सरपंच श्री सुधाकर मानकर,डॉ श्याम जाधव,डॉ.राम कुलसंगे, डॉ.विनायक भटकर,डॉ. अजय कुकडे,डॉ.रविकांत महिंदकर , रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.शशिकांत काळे,महिला रासेयो कार्यक्रम अधिकारी कु.अर्चना राऊत, दिनेश राऊत,निलेश खुरद, संतोष चव्हाण,निलेश बंदे व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Tuesday, August 1, 2023

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न.

 



संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरुड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी. आर.तडस हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.श्याम जाधव हे उपस्थित होते. सर्व प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. प्राचार्य डॉ.जी.आर.तडस यांनी आपले विचार मांडताना साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या प्रभावी लेखनेतून, वाणीतून वंचितांच्या व्यथा मांडण्याचे अनमोल कार्य केले. समतावादी,सुधारणावादी, प्रगतीवादी लेखन करून समाज प्रबोधनाचे महान कार्य केले. तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी गणेशउत्सव व शिवजयंती साजरी करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला होता.असे प्रतिपादन केले. याप्रसंगी डॉ. श्याम जाधव,डॉ.राम कुलसंगे,डॉ.विनायक भटकर,डॉ अजय कुकडे,श्री दिनेश राऊत श्रीनिलेश खुरद, कु.अर्चना राऊत,श्री संतोष चव्हाण, श्री निलेश बंदे,श्री अनिल हरले इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन डॉ.राम कुलसंगे यांनी केले तर आभार श्री दिनेश राऊत यांनी मानले.

N-LIST Awareness Workshop कार्यशाळेचे आयोजन

          संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणि...