Monday, July 24, 2023

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह साजरा

 

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरुड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये





राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह साजरा करण्यात आला.त्या निमित्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी.आर.तडस हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ अजय कुकडे हे उपस्थित होते.प्रमुख अतिथी डॉ.श्याम जाधव,डॉ.विनायक भटकर हे उपस्थित होते. सर्व सर्वप्रथम शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ.राम कुलसंगे यांनी 'नवीन शैक्षणिक धोरण सप्ताहकार्यक्रम घेण्यामागील संपूर्ण पार्श्वभूमी समजावून सांगितली. डॉ अजय कुकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारत हा जागतिक पातळीवर नावलौकिक असणारा देश असून नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्याने आपला देश कर्तुत्वसंपन्न व अर्थसंपन्न होणार आहे अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जी.आर.तडस यांनी नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या हिताचे असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास  होणार असल्याचे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी डॉ.श्याम जाधव यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अध्ययन कक्षा रुंदावणार असून विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणार असल्याचे प्रतिपादन केले.तर प्रमुख डॉ.विनायक भटकर यांनी शैक्षणिक क्रांती म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण होय समाजाचा सर्वांगीण विकास या धोरणामुळे होणार असून आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक विकासाची प्रक्रिया शिक्षणातून उभी राहते नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशाच्या भविष्यासाठी,हितासाठी एक विकासाचा मार्ग आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.रविकांत महिंदकर यांनी केले.तर आभार प्रा.शशिकांत काळे यांनी मानले.

या प्रसंगी डॉ.जी.आर. तडस,डॉ.श्याम जाधव,डॉ.राम कुलसंगे,डॉ.विनायक भटकर,डॉ.अजय कुकडे,डॉ.रविकांत महिंदकर, प्रा. शशिकांत काळे,दिनेश राऊत,निलेश खुरद,अर्चना गायकवाड,संतोष चव्हाण,निलेश बंदे,अनिल हरले, कु.वैष्णवी धरणे,लोकेश, सिरसाम,पवन भुजाडे इत्यादी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, July 22, 2023

कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी मेळावा संपन्न : धाडसी निर्णय घेण्याची क्षमता महाविद्यालयातूनच मिळाली श्री सोपान भाऊ ढोले यांचे प्रतिपादन.








 श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित जरूड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये नुकताच माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. आर. तडस हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री सोपान भाऊ ढोले ,प्रमुख अतिथी म्हणून  श्री किरण भाऊ शेरेकर कोषाध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना ,श्री नाना वानखडे सचिव माजी विद्यार्थी संघटना तसेच  डॉ प्रदीप ढोले उपाध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना ,आय.क्यू.ए.सी कॉर्डिनेटर डॉ.अजय कुकडे, माजी विद्यार्थी संघटना समन्वयक डॉ.श्याम जाधव  उपस्थित होते.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ.अजय कुकडे यांनी माजी विद्यार्थी मेळावा घेण्यामागील महाविद्यालयाची नेमकी भूमिका स्पष्ट केली. श्री सोपान ढोले यांनी महाविद्यालयातील संस्कारामुळे, येथील शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेमुळे मी आज उभा आहे.माझ्यामध्ये नेतृत्व गुणांचा विकास झाला.धाडशी निर्णय घेण्याची क्षमता येथूनच मला मिळाली त्याबद्दल मी महाविद्यालयाचा ऋणी सदैव ऋणी राहील असे प्रतिपादन केले. श्री किरण शेरेकर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी आमचे (माजी विद्यार्थ्यांचे )नेहमी सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. डॉ.प्रदीप ढोले यांनी  येथील महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी आम्ही सर्व माजी विद्यार्थी आपणास सहकार्य करू असे सांगितले. प्रा.सुषमा मानेकर यांनी महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षण घेण्याकरिता या  महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आर्थिक सहाय्य  केल्याचे आवर्जून सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जी.आर.तडस यांनी अध्यक्षीय भाषणामधून  माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या प्रगतीसाठी मोलाचा वाटा उचलावा तसेच आपण या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून नेहमी आम्हाला सहकार्य करावे असे प्रतिपादन केले.तसेच या प्रसंगी श्री रवींद्र(नाना)वानखडे,श्री किशोर वाडबुदे,नितेश लोणकर, मनीष गवळी, प्रियकांत खेडकर,संस्कृती पांडे,अरुणा तिनखेडे,श्री निलेश बंदे, सौ भावनाताई सातपुते यांनी आपले विचार मांडले.या प्रसंगी डॉ.राम कुलसंगे,प्रा.शशिकांत काळे ,मुख्य लिपिक श्री दिनेश राऊत,वरिष्ठ लिपिक निलेश खुरद,कनिष्ठ लिपिक अर्चना राऊत,योगेश कासे,श्री अनिलभाऊ हरले इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन माजी विद्यार्थी संघटना समन्वयक डॉ.श्याम जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.शशिकांत यांनी केले.


 

Tuesday, July 18, 2023

कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी कार्यक्रम.

 

 


 श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित जरूड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ जी.आर.तडस हे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विनायक भटकर, डॉ. श्याम जाधव होते. या निमित्ताने प्रास्ताविक डॉ. अजय कुकडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ रविकांत महिंदकर यांनी केले तर आभार डॉ.राम कुलसंगे यांनी मानले. याप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत काळे   निलेश खुरद,अर्चना राऊत,संतोष चव्हाण,योगेश कासे ,निलेश बंदे व विद्यार्थी उपस्थित होते.

Friday, July 14, 2023

जरूड येथील कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये एक महिन्याचे ग्रंथालय प्रशिक्षण संपन्न




       संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ जी आर तडस यांच्या नेतृत्वात व ग्रंथपाल डॉ. रविकांत महिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल डॉ.विजय ठाकरे आय एम एस कॉलेज वरूड यांच्या विशेष सहकार्याने ग्रंथालय विभागाच्यावतीने एक महिन्याचे ग्रंथालय प्रशिक्षण देण्यात आले.यामधे आय एम एस महाविद्यालय,वरूड येथील बी.लीफ.च्या कु.आचल बहुरूपी, मुकेश युवनाते, कु.रुपाली उईके, कु.समीक्षा ढोक, कु.पायल खनखने, कु.मनिषा ब्राम्हणे या विद्यार्थ्यांनी  ग्रंथालयातील संगणिकिकृत सर्व कामे  एक महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये डॉ रविकांत महिंकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केले. सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व भेटवस्तू वितरित करण्यात आल्या.

    या प्रशिक्षणामध्ये या डॉ श्याम जाधव,डॉ राम कुलसंगे,डॉ विनायक भटकर,डॉ अजय कुकडे,प्रा शशिकांत काळे,श्री दिनेश राऊत श्री निलेश खुरद,श्री गजानन चव्हाण,अर्चना राऊत,श्री संतोष चव्हाण,श्री योगेश कासे,श्री निलेश बंदे,अनिल हरले इत्यादींनी सहकार्य केले.

N-LIST Awareness Workshop कार्यशाळेचे आयोजन

          संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणि...