Wednesday, September 27, 2023

डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा स्मृतिदिन 'ग्रंथ वाचन चर्चा स्पर्धा' घेऊन साजरा



 श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित  जरुड येथील कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये डॉ. एस आर रंगनाथन यांचा स्मृतिदिन ग्रंथालय विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ.जी.आर.तडस यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.आर.तडस हे उपस्थित होते.ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.स्वामी रंगनाथन यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रंथालय विभागाकडून विद्यार्थ्यांना ग्रंथ वाचण्यासाठी भेट देण्यात आले.शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख  उपाख्य भाऊसाहेब यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त ग्रंथालय विभागाच्या वतीने भाऊसाहेबांनी लिखित 'वैदिक धर्म उद्गम आणि त्याचा विकास' या ग्रंथावर 'ग्रंथ वाचन व चर्चा'अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून आपली मते मांडली. प्राचार्य डॉ जी आर तडस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाने माणूस समृद्ध होत असून रोज आपण वाचन करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.स्पर्धेमध्ये लोकेश सिरासम याने प्रथम क्रमांक पटकावला. कु.शितल राऊत हिचा द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक पवन भुजाडे याने पटकाविला.या प्रसंगी डॉ.रविकांत महिंदकर (ग्रंथपाल) यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजून सांगितले तसेच डॉ.एस.आर.रंगनाथन यांनी सांगितलेली पंचसूत्राची महती विद्यार्थ्यांना पटवून दिली. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आपण ग्रंथालयामध्ये वेळ घालवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ .महिंदकर यांनी केले. याप्रसंगी डॉ.एस एम.जाधव,डॉ.राम कुलसंगे डॉ.अजय कुकडे प्रा.शशिकांत काळे,निलेश खुरद,अर्चना राऊत,पवन भुजाडे लोकेशन सिरसाम,मयूर कुंभारे,शितल राऊत,सुष्मिता झोडे, वैष्णवी मरस्कोल्हे, अंकुश युवनाते,राहुल धुर्वे,मृणाली मालधूरे, सुनाक्षी दवंडे,मंजुषा कुमरे,दर्शन महल्ले ,विशाल कंगाले इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

N-LIST Awareness Workshop कार्यशाळेचे आयोजन

          संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणि...