Saturday, December 30, 2023

N-LIST Awareness Workshop कार्यशाळेचे आयोजन

         

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभाग व आय.क्यू.ए.सी.विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  प्राचार्य डॉ जी. आर.तडस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल डॉ.रविकांत महिंदकर यांनी 'एन लिस्ट' कार्यशाळेचे आयोजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी. आर.तडस हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून 'डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज' ,मुंबई येथील ग्रंथपाल डॉ. संघर्ष गजभिये उपस्थित होते.त्यांनी मार्गदर्शन करताना एन- लिस्ट मध्ये आपले खाते कसे उघडायचे, त्याचा वापर कसा करायचा इत्यादी बारीसारीक बाबी समजावून सांगितल्या.तसेच ई- रिसोर्सेस बुक्स, ई- जर्नल्स यांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थी व प्राध्यापक यांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देऊन समाधान केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जी. आर.तडस यांनी एन-लिष्ट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना जगातील कोणतेही इ- जर्नल्स, इ - बुक्स वाचता येईल ही आपल्या ग्रंथालयाची मोठी उपलब्धी होय.याचे श्रेय ग्रंथपाल डॉ.रविकांत महिंदकर यांना जाते असे  गौरवोद्गार काढले.याप्रसंगी  डॉ.श्याम जाधव,डॉ.राम कुलसंगे, डॉ.अजय कुकडे, डॉ.रविकांत महिंदकर,डॉ.नलिनी बोडखे,डॉ. व्ही .जी वसू, प्रा.उदय ठाकरे,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.शशिकांत काळे, योगेश कासे,प्रा. प्रदीप आवारे, प्रा. तेजश्री घोटकर,प्रा.मोहिनी दारोकर,प्रा.प्रतीक्षा पाटील,प्रा. समीक्षा बिडकर, प्रा.रेणुका वानखडे, प्रा.लीलाधर चौधरी,प्रा. रूपाली सवई,प्रा.सीमा कानडे, प्रा.प्रज्ञा निंभोरकर,मुख्य लिपिक श्री दिनेश राऊत,निलेश खुरद,अर्चना राऊत,संतोष चव्हाण,महेंद्र कडू, युगल इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन श्री गजानन चव्हाण यांनी केले तर आभार निलेश बंदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

N-LIST Awareness Workshop कार्यशाळेचे आयोजन

          संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणि...