Monday, December 25, 2023

शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त ग्रंथ प्रदर्शन








 शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त ग्रंथ प्रदर्शन 

दि.25/12/2023

   संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ जी. आर.तडस यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त ग्रंथपाल डॉ.रविकांत महिंदकर यांनी दि.25/12/2023 रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले. ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध ग्रंथांची ओळख व्हावी,वाचन संस्कृती रुजावी.या हेतूने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.सर्व प्रथम शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण  करण्यात आले. प्राचार्य डॉ.जी. आर. तडस यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवन जगण्याचे बळ व सामर्थ्य आपल्याला ग्रंथातून मिळते.ग्रंथ हे मानवाचे गुरु असून ते आपले मार्गदर्शक आहेत. ग्रंथ वाचनाने एक नवी,उमेद नवी ऊर्जा मिळते. त्यामुळे प्रत्येकाने अभ्यासाव्यतिरिक्त रोज किमान एक तास तरी वाचन करावे.असे प्रतिपादन केले.या प्रसंगी माजी मुख्याध्यापक श्री गोपाल तडस, श्री जगदीशराव देशमुख, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष श्री सोपान ढोले,श्री नाना वानखडे, ह.भ.प.श्री रविंद्र बारस्कर, डॉ.श्याम जाधव,डॉ.राम कुलसंगे, डॉ.अजय कुकडे, डॉ.रविकांत महिंदकर,डॉ.नलिनी बोडखे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.शशिकांत काळे, योगेश कासे,प्रा. प्रदीप आवारे, प्रा. तेजश्री घोटकर,प्रा.मोहिनी दारोकर,प्रा.प्रतीक्षा पाटील,प्रा. समीक्षा बिडकर, प्रा.रेणुका वानखडे, प्रा.लीलाधर चौधरी,प्रा. रूपाली सवई,प्रा.सीमा कानडे, प्रा.प्रज्ञा निंभोरकर,मुख्य लिपिक श्री दिनेश राऊत,निलेश खुरद,अर्चना राऊत,संतोष चव्हाण,अनिल हरले,इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन डॉ.रविकांत महिंदकर यांनी केले तर आभार निलेश बंदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

N-LIST Awareness Workshop कार्यशाळेचे आयोजन

          संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणि...