Tuesday, October 3, 2023

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्य स्वच्छ्ता अभियान

            

    संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरुड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ.जी.आर.तडस यांच्या मार्गदर्शनाखाली 02 ऑक्टोंबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महाविद्यालयातील सुका व ओला कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. परिसरातील खड्डे बुजविण्यात आले.महाविद्यालयाचे पटांगण झाडून लख्ख लख्ख स्वच्छ करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. आर.तडस  रासेयो कार्यक्रमाधिकारी 

प्रा.शशिकांत काळे ,महिला रासेयो कार्यक्रम अधिकारी अर्चना राऊत, दिनेश राऊत,संतोष चव्हाण, निलेश बंदे, अनिल हरले,अंबादास  खंडारे तसेच रासेयो  स्वयंसेवक पवन भुजाडे, राहुल धुर्वे,कु. वैष्णवी मरस कोल्हे खूप अंजूषा कुंबरे कु.मृणाली मालधुरे , कु पल्लवी टेकोडे, कु.शितल राऊत, कु.सुष्मिता जोडे, कु.सुनाक्षी दंडाळे कु.तेजस्विनी इंगळकर, कु.मृणाल चंदने, कु.साक्षी रडके, विशाल डोंगरे, राहुल धुर्वे ,पवन भुजाडे इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

N-LIST Awareness Workshop कार्यशाळेचे आयोजन

          संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणि...