Tuesday, August 29, 2023

कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये नुकताच पाचवा पदवी वितरण समारंभ संपन्न

 


                     संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये नुकताच पाचवा पदवी वितरण समारंभ प्राचार्य डॉ.जी.आर.तडस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा व शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून तसेच विद्यापीठ गीत गाऊन करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.आर.तडस हे उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.आर.एन.फुलारी, डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी कला महाविद्यालय,शेंदूरजनाघाट,हे उपस्थित होते.तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ राम कुलसंगे,डॉ.विनायक भटकर,डॉ.रविकांत महिंदकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.जी.आर.तडस यांनी काळानुसार विद्यार्थ्यांनी बदलले पाहिजे.परिवर्तन हा सृष्टीचा नियम असून ज्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेतले ते पुढे गेले.सत्यवादी , प्रामाणिक माणूस जीवनात कधीही अयशस्वी होत नाही.हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. पुस्तकांशी नाते जोडा पुस्तकेच आपले खरे गुरु आहेत.असे प्रतिपादन केले. तर प्रमुख अतिथी डॉ.आर.एन.फुलारी यांनी   सध्याच्या काळात संघर्षा शिवाय पर्याय नाही.विद्यार्थ्यांनी पदवी मिळून स्वयंरोजगार निर्माण करावा. विद्यार्थ्यांनी निराश हतबल न होता त्यातून मार्ग काढून परिस्थितीवर मात करावी. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करावे.आत्मनिर्भर बनवून मन ओतून प्रत्येक काम करावे. कला कौशल्य वापरून रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्या.हस्त कौशल्य,बुद्धी कौशल्य आणि भाषा कौशल्य इत्यादी कौशल्ये आत्मसात करून स्वतःचा विकास करावा. शिक्षणामुळे तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि तुम्ही स्वयंपूर्ण जीवन जगण्यास पात्र होता.असे सांगितले. या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.विनायक भटकर, डॉ.रविकांत महिंदकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.

कला शाखेच्या 5 विद्यार्थ्यांना पदवीचे वितरण सन्माननीय अध्यक्षांच्या व प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.आकाश मानकर व कु. रोशनी बडोदे या  2 विद्यार्थ्यांनी प्रविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केली.तर 3 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राम कुलसंगे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्याम जाधव यांनी केले.या प्रसंगी डॉ.राम कुलसंगे , डॉ.विनायक भटकर,डॉ.रविकांत महिंदकर प्रा. शशिकांत काळे ,गजानन चव्हाण,अर्चना राऊत,दिनेश राऊत, निलेश खुरद, राहुल धूर्वे, गणेश आहाके,अनुप बगेकर,गौरव यावलकर,प्रतीक होले,सोनाक्षी दंडाळे, कु.सोनम बडोदे, प्रा.प्रदीप आवारे,प्रा.बिडकर मॅडम,प्रा. मोहिनी दारोकर,निलेश बंदे तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

 

 

No comments:

Post a Comment

N-LIST Awareness Workshop कार्यशाळेचे आयोजन

          संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जरूड येथील कला व वाणि...